‘Baapjanma’ will be a turning point says, Pushkaraj Chirputkar

Baapjanma Pushkaraj 02

 

‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेने प्रसिद्ध झालेला आशू ऊर्फ पुष्करराज चिरपुटकर लवकरच निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बापजन्म’ चित्रपटात माऊली या महत्त्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येत आहे.

 

पुष्करराज चिरपुटकर याचा जन्म पंजाबमधील मोगा येथे झाला. त्याचे इंजिनीअिरगपर्यंतचे सर्व शिक्षण पिंपरी- चिंचवडमध्ये झाले. त्याच्या घरात अभिनयाचा वारसा वगैरे अजिबात नाही पण त्याला कायम अभियन्ता व्हायची इच्छा होती. सर्व सामान्य आयुष्यात काही तरी वेगळं करणं हाच त्याचा ध्यास होता. यामुळे त्याने अनेक लहान-मोठी नाटकं शाळा-कॉलेजमध्ये केली तसेच इंजिनीअिरग कॉलेजमध्ये शिकत असताना हौशी रंगभूमीमध्ये विक्रम गोखले यांनी अजरामर केलेल्या बॉरिस्टर या नाटकाची कॉपी त्याने कॉलेजात सादर केली व या मध्ये त्याने मी भाऊराव ही भूमिका साकारली होती.

या नंतर ‘दिल दोस्ती’ मधील आशूची भूमिका सुभ्रत जोशी आणि अमेय वाघ यांच्याशी असलेल्या मैत्रीतून त्याला मिळाली.आशू साकारणे त्याला अवघड होते, कारण आशू सगळय़ाच बाबतीत पुष्करपेक्षा अगदी भिन्न आहे. पण या मालिकेमुळे पुष्करचा आशू झाला आता त्याला हेच चित्र बदलायचे आहे. ‘बापजन्म’ मधली भूमिकेविषयी बोलताना पुष्कर म्हणाला कि त्याने या आधीही निपुण धर्माधिकारी बरोबर अनेक कामं केली आहे. या चित्रपटासाठी जेव्हा त्याला विचारण्यात आले तेव्हा त्याने लगेच होकार दिला. सचिन खेडेकरसारख्या दिग्गज कलाकाराबरोबर काम करण्याची संधी, नवं कॅरेक्टर, नवी ओळख निर्माण करण्याची संधी त्याला ‘बापजन्म’ मधील माऊली या कॅरेक्टर मुले मिळाली. ‘बापजन्म’ बाप आणि मुलगा यांच्यातली गोष्ट २९ सप्टेंबरला प्रदर्शित होतो आहे.