Atul Kulkarni to play officer in upcoming Web-series.

Atul Kulkanri in Webseries 01

अतुल कुलकर्णी हे नाव चित्रपटसृष्टीसाठी नविन नाही . अतुल कुलकर्णी यांचा जन्म  कर्नाटक येथे १० सप्टेंबर १९६५ रोजी झाला. अतुल कुलकर्णी यांचे  मराठीतील विशेष गाजलेले चित्रपट म्हणजे नटरंग,वळू, देवराई,हैप्पी जर्नी.  अतुल कुलकर्णी  यांनी मराठीसोबतचअनेक भाषांमध्ये काम केले आहे. हिंदी ,तामिळ, कन्नड, इंग्लिश, मल्याळम भाषांमध्ये त्यांनी काम केले आहे . अतुल कुलकर्णी यांना कायमच त्यांच्या चांगल्या भूमिकांसाठी समीक्षकांची दाद मिळाली आहे .त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. ‘हे राम’ आणि ‘चांदनी बार’ ह्या चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.

नुकत्याच त्यांनी ‘गाझी अटॅक’ आणि ‘रईस’ हा चित्रपटात वैविध्यपूर्ण भूमिका केल्या आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत कायमच वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची निवड केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते आता एकता कपूर यांच्या वेब सिरीज काम करणार आहेत हि वेब सिरीज नागेश कुकनूर दिग्दर्शित करणार आहेत. एकता कपूर निर्माती असलेल्या या वेबसीरिजचे नाव अद्याप तरी ठरलेले नाही
ह्या वेब सिरीज मध्ये त्यांची भूमिका हि एका स्पेशल फोर्स ऑफिसर ची असणार आहे ह्या भूमिकेबद्दल जास्त माहिती देण्याचे त्यांनी टाळले आहे.

सैनिकांना विशेष प्रशिक्षण देणाऱ्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत ते आहेत त्यांच्या भूमिकेचे नाव ब्रिगेडियर साठेय असे आहे. याबद्दल अतुल कुलकर्णी यांनी एका मुलाखतीत असे सांगितले कि त्यांच्या वाट्याला कायमच वेगळ्या धाटणीच्या कथा आणि भूमिका आल्या त्यामुळे ते स्वतःला खूप भाग्यवान समजतात. पुढे ते असेही सांगतात कि जेव्हा त्यांना ह्या भूमिकेसंबंधी विचारण्यात आले तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. याचे एक कारण असे आहे की प्रेक्षकांना नेहमी सैनिकांसंबंधित बनणाऱ्या मालिका व चित्रपटतांबद्दल विशेष आत्मीयता वाटते. सैनिकांचे खरे आयुष्य व त्यांची सैन्य दलातील वाटचाल याबद्दल जाणून घेणयासाठी प्रेषक कायम उत्सुक असतात.

अतुल कुलकर्णी यांच्या या वेब सिरीज मधून प्रेक्षकांना सैनिकांबद्दल नवीन माहिती मिळणार हे नक्कीच. एकता कपूर व नागेश कुकनूर यांच्या टीम सोबत काम करण्याचा अनुभव अतुल कुलकर्णी यांच्यासाठी विशेष होता. अतुल कुलकर्णी यांना त्यांच्या या नविन वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published.