“Ashi Hi Ashiqui” upcoming movie featuring Abhinay Berde and this new actress .

AHA 03

 

मराठी चित्रपटसृष्टीतील सुपर स्टार अर्थात सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, आणि अशोक सराफ. या . या मराठी सिनेसृष्टीचे चार महानायकानी त्यांच्या काळात या मंडळींनी प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य करत गाजवला. दुर्दैवाने लक्ष्मीकांत बेर्डे या महान कलाकाराला आपण खूप लवकर गमवून बसलो. आता सुखद वार्ता हि कि ह्या मंडळींची पुढची पिढी आता चित्रपटसृष्टीत स्थान घेऊ पाहतेय. सचिन पिळगांवकर ह्यांची मुलगी, महेश कोठारेंच्या मुलाने तर खूप आधीच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे. आणि आता यांच्या पाठोपाठ आता दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांचा मुलगा अभिनय बेर्डे आपल्याला चित्रपटातून दिसणार आहे.

 

AHA 04

 

“अशी हि आशिकी” असं या चित्रपटाचे नाव असून हा सचिन पिळगांवकरांचा यांचा चित्रपट आहे. मागीलवर्षी १५ ऑगस्ट रोजी सचिन पिळगावकर यांच्या वाढदिवशी त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली होती. सचिन पिळगांवकर आणि दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांची घनिष्ठ मैत्री होती. अभिनय बेर्डेचा हा दुसरा चित्रपट असून अभिनयने सतिश राजवाडेंच्या “ती सध्या काय करते” या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीती पदार्पण केले होते. आता ‘अशी ही आशिकी’मधून पुन्हा एकदा तो प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.

 

AHA 02

या चित्रपटाच्या शूटिंगला आता सुरुवात झाली असून हेमल इंगळे हि या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. तरुण पिढीतील लव्हस्टोरी आपल्याला या चित्रपटातून पाह्यला मिळणार आहे .हेमलचा हा पहिलाच चित्रपट आहे. अभिनय आणि हेमल हि जोडी प्रेक्षकांना कशी वाटते हे आपल्याला चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर कळेल. या शिवाय अभिनेते जयवंत वाडकर यांची ही या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका असणार आहे.