Ankush Chaudhari ‘s upcoming movie ‘Sukh Mhanje Nakki Kay Asta’

SMNKA03

 

मराठी चित्रपटसृष्टीतील डॅशिंग हिरो अंकुश चौधरी आणि अनेक जाहिरांतीतून झळकलेली झीनल कामदार हि जोडी आपण लवकरच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या चित्रटातुन पाहणार आहोत. झीनल कामदार यांचा हा पहिला मराठी चित्रपट आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला . या वेळी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नोंदवली होती. ‘साईबाबा स्टुडिओज’ आणि ‘समृद्धी सिनेवर्ल्ड’ हे एकत्रित पणे या चित्रपटाची निर्मिती करीत असून अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे चित्रित होणारा मराठीतला हा पहिला चित्रपट ठरणार आहे. दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून सत्य घटनेवर आधारित अमेरिकेत घडणारी कथा सुख म्हणजे नक्की काय असतं या चित्रपटातून उलगडणार आहे.

 

SMNKA01

 

या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माते शिवकुमारआणि संवेदनशील दिग्दर्शिका समृद्धी पोरे हे एकत्र आले आहेत. तसेच छोट्या पडद्यावर आपल्या अनेक दर्जेदार कलाकृतींनी वेगळं स्थान निर्माण करणारे निर्माते–दिग्दर्शक गजेंद्र सिंग हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. मराठी रुपेरी पडद्यावरचा डॅशिंग हिरो अंकुश चौधरी यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.

 

SMNKA02

 

 

लॉस एंजलिस स्थित ‘फाईव्ह डायमेंशन्स एंटरटेन्मेंट’ ही कंपनी या चित्रपटाचे लाईन प्रोड्यूसर म्हणून काम पाहाणार आहेत.हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल अशी संपूर्ण टीम ची खात्री आहे. चित्रपटाच्या मुहुर्तावेळी ‘दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणणे हे खरं सुख आहे आणि हा चित्रपट तुम्हाला निश्चितच हा अनुभव देईल, असा विश्वास अभिनेता अंकुश चौधरीने व्यक्त केला . तसेच मराठी चित्रपटसृष्टीच्या पदार्पणातच मान्यवरांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद अभिनेत्री झीनल कामदारने व्यक्त केला. सूत्रांच्या माहिती नुसार ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मे महिन्याच्या अखेरीस लॉस एंजलिस येथे सुरुवात होणार आहे.