Amruta Khanvilkar to be seen in Karan Johar’s upcoming movie ‘Raazi’

Amruta khanvilkar Raazi 03

 

आपल्या नृत्याने आणि दमदार अभिनयाने मराठी चित्रपटसुष्टीत ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर ‘राझी’ या हिंदी चित्रपटात दिसणार आहे. ‘राझी’ हा चित्रपट धर्मा प्राॅडक्शन्सचा असून अमृताने याची माहिती ट्विटरवरून चाहत्यांना दिली आहे. त्यामुळे चाहते देखील अमृताचा हा चित्रपट पाहण्यास आतुर आहेत फक्त मराठीच नाही तर तिने इतर भाषेतील प्रेक्षकांचे सुद्धा मन जिंकले आहे. तिचा चाहता वर्ग हा फार मोठा असून हि संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. धर्मा प्रोडक्शन निर्मित “राजी” या आगामी हिंदी चित्रपटात तिची भूमिका पाहण्यासाठी तिची चाहते खूप उत्सुक आहेत.

 

याआधी देखील तिने अनेक हिंदी चित्रपटात काम केलं असून तिच्या अभिनयाने बॉलीवूड मध्ये तिने तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण “राजी” या चित्रपटातील तिची भूमिका उल्लेखनीय असणार आहे. हा चित्रपट अमृता साठी एक नवीन वाटचाल ठरेल असे म्हणण्यास हरकत नाही.

 

Amruta khanvilkar Raazi 02

अमृता खानविलकरने कायम तिच्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.”राजी” या चित्रपटाचे नुकतंच चित्रीकरण सुरु झाले आहे. चित्रपटात बॉलीवूड मधील अग्रेसर अभिनेत्री आलिया भट्ट आणि उत्तम अभिनेता म्हणून ओळखला जाणारा विकी कौशल प्रमुख भूमिकेत दिसतील. या चित्रपटाची निर्मिती खुद्द करण जोहर करणार असून हरहुन्नरी अशा मेघना गुलजार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या आधी कंगना राणावतच्या ‘रंगून’ या चित्रपटात सुद्धा अमृताने छोटी भूमिका साकारली होती.आता धर्मासारख्या मोठ्या बॅनरमध्ये तिला प्रवेश मिळणे हे मराठी प्रेक्षकांसाठी सन्मानानीया गोष्ट आहे. या चित्रपटासाठी अमृताने पहिला सीन दिल्यानंतर तिने ट्विटरवर फोटोसहित माहिती दिली.