Amey Wagh’s upcoming movie ‘Girlfriend’

अभिनेता अमेय वाघ सध्या सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. ‘फास्टर फेणे’ फेम अभिनेता अमेय वाघ चा नवा चित्रपट येत असून सध्या तो त्याच्या आणि त्याच्या ‘गर्लफ्रेंड’ च्या चर्चांमुळे सोशल मीडिया साईट वर वायरल झाला आहे.’दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे अमेय वाघ यांनी त्याचा स्वतंत्र प्रेक्षक वर्ग निर्माण केला. या नंतर अमेयनं मोठ्या पडद्यावरही जबरदस्त सुरुवात केली. आपल्या खाजगी आयुष्यात जवळपास वर्षभरापूर्वी विवाहबंधनात अडकलेला अमेय आता ‘गर्लफ्रेंड’ च्या चर्चा का करतोय? असाही प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला.

 

Amey Wagh Girlfriend 01

 

जरा मदत हवीये तुमची! मुलीसाठी नाव सुचवा प्लीज! असा मेसेज अमेय ने काही दिवसांपूर्वी टाकला होता. आणि या नंतर ही मुलगी कोण? आणि अमेय गुडन्यूज देणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनातयेऊ लागले .हल्ली कॉलेजला जाणाऱ्या प्रत्येक मुलाला आपल्याला एक गर्लफ्रेंड असावी असे वाटते. गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असणे ही गोष्ट सध्या अतिशय कॉमन झाली आहे. आणि एखाद्याला गर्लफ्रेंड नसेल तर ती व्यक्ती काहीशी निराश दिसते तसेच इतर मित्र त्याची खिल्ली उडवतात. तर हि अवस्था आता झाली आहे ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटातील नचिकेत प्रधान यांची . ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटातील हि भूमिका अभिनेता अमेय वाघ साकारत असून तो म्हणतो … मी ‘गर्लफ्रेंड’ पटवणार.

 

Amey Wagh Girlfriend 02

 

ह्यूज प्रॉडक्शन्स आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटाचे लेखन – दिग्दर्शन उपेंद्र सिधये यांनी केले आहे . सध्याच्या तरुण पिढीतील एका मुलाची कथा मांडणार हा चित्रपट आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. व आता या चित्रपटाचा टीजर सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला आहे. या टीझर मध्ये नचिकेताला कुठे एखाद कपल दिसलं, तर ह्यांच्या अंगी निराशेची लहर संचार करते, त्यातून तो ‘गर्लफ्रेंड तर पाहिजे ना यार’ असे म्हणत ‘मी गर्लफ्रेंड पटवणार’ हा दृढनिश्चय नचिकेतने केला आहे. आता खरोखर अमेय म्हणजेच नचिकेत प्रधानला गर्लफ्रेंड मिळणार का? हे चित्रपट पहिला कि आपल्याला नक्की कळेल.