Akash Thosar’s First Hindi Movie ‘ Lust Stories

Akash Thosar in Lust stories 04

 

काही दिवसंन पूर्वी नेटफ्लिक्सनं आपला तिसरा भारतीय सिनेमा ‘लस्ट स्टोरी’ चा ट्रेलर प्रदर्शित केला होता . काल १५ जुने रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी एकत्र येऊन बनवला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक करण जोहर, अनुराग कश्यप, झोया अख्तर आणि दिबाकर बॅनर्जी या दिग्दर्शकांच्या कहाण्या या चित्रपटातून एकत्रित दिसणार आहेत. या चित्रपटात राधिका आपटे, आकाश ठोसर, भूमी पेडणेकर, विक्की कौशल, कियारा आडवानी, मनीषा कोयराला, संजय कपूर हे कलाकार झळकणार आहेत. विशेष म्हणजे, ‘सैराट’ फेम आकाश ठोसर याचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटातील आकाशचा लूकही प्रेक्षकांसाठी आकर्षक ठरतोय.

 

Akash Thosar in Lust stories 02

 

आकाश करत असलेल्या या कहाण्यांमध्ये राधिका एका महाविद्यालयीन प्रोफेसरच्या भूमिकेत दिसतेय व आकाश हा तिचा विद्यार्ती आहे … ही कथा अनुराग कश्यपनं दिग्दर्शित केलीय. दुसऱ्या कथेत भूमी पेडणेकर एका नोकरानीच्या भूमिकेत आहे… ती आपल्या मालकाच्या मुलाच्या प्रेमात पडलीय… ही कथा झोया अख्तर हिनं दिग्दर्शित केली आहे. तिसरी कथा करण जोहर यांनी दिग्दर्शित केली असून कियारा आडवानी, विक्की कौशल आणि नेहा धुपिया या कथेत दिसतात.

 

Akash Thosar in Lust stories 03

 

चौथ्या कथेचं दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जी यांनी केलंय… या कथेत मनीषा कोईराला, संजय कपूर आणि जयदीप अहलावत यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.या कथन एकत्र जोडणारा धागा म्हणजे प्रेम आणि विविध नाती आणि त्यांच्या मधील ताण तणाव . या आधी या सर्व दिग्दर्शकांनी पाच वर्षांपूर्वी शॉर्ट फिम्ससाठी हातमिळवणी केली होती. ‘बॉम्बे टॉकीज’ (२०१३) मध्ये याच चार दिग्दर्शकांच्या कथा दाखवण्यात आल्या होत्या. या सिनेमाला टीकाकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता… पण, बॉक्स ऑफिसवर मात्र हा सिनेमा फोल ठरला.