Ajay Devgan to be seen in upcoming Marathi movie

Ajay Devgan to act in marathi movie 02

 

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता निर्माता अजय देवगण प्रादेशिक भाषेतील चित्रपटांची निर्मिती करत आहेत. अजय देवगण यांच्या प्रोडक्शन कंपनी ने अनेक चांगले चित्रपट देण्याचा प्रयत्न आज पर्यंत केला आहे. अनेक चांगल्या विषयांवरचे चित्रपट त्यामुळे प्रेक्षकांना अनुभवता येत आहेत . तसेच आशयघन विषयावरील चित्रपटाची निर्मिती करणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे.

 

लवकरच अजय देवगण प्रोडक्शन एक वेगळ्या विषयावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे दिग्दर्शन सतिश राजवाडे करणार असून नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाविषयी आणखी एक विशेष गोष्ट आहे. ती म्हणजे अजय देवगण आय चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांनसमोर येत आहेत. अजय देवगणच्या चाहत्यांसाठी हि खूप आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाच्या भूमिकेसाठी अजय काजोलकडून मराठीचे धडे घेत आहे. काजोल यांच्या आई तनुजा मराठी आहेत तयामुळे काजोल खूपच छान मराठी बोलते.

 

या आगामी चित्रपटात नाना पाटेकर, इरावती हर्षे आणि सुमीत राघवन प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण प्रोडक्शन, अभिनव शुक्ला आणि मनिष मिश्रा यांचे वॉटरगेट प्रोडक्शन एकत्र येऊन करणार आहे. तसेच नाना पाटेकर या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचा मुहूर्त काजोल यांच्या उपस्थित झाला सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे.

 

Ajay Devgan to act in marathi movie 01

Leave a Reply

Your email address will not be published.