Actor Santosh Juvekar is working on this International Project.

अभिनेता संतोष जुवेकर यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमधून महाराष्ट्राच्या जनतेवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सकस अभिनयाने त्यानी मराठी चित्रपटसृष्टीत आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. लवकरच आपण त्यांना एका जर्मन चित्रपटात पाहणार आहोत. ‘डिसोनन्स’ असं या चित्रपटाचं नाव असून अभिनेता संतोष जुवेकर यांच्या पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये संतोष एका आर्मी ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. ‘डिसोनन्स’ ही सायन्स फिक्शन फिल्म असून या चित्रपटासाठी सध्या ते प्रचंड मेहनत घेत आहे.

 

Santosh Juvekar 01

विशेष म्हणजे या भूमिकेसाठी संतोष जुवेकर यांनी मागील काही महिन्यापासून त्यांच्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली आहे. आर्मी ऑफिसरसारखा फिटनेस मेन्टेन करण्यासाठी त्यांनी योग्य आहार आणि जीम ट्रेनिंग केली आहे. या शिवाय फिजिकल अपिअरन्स आणि वागण्या-बोलण्याच्या पध्दतीं साठी त्यांनी बारकाईने अभ्यास केला. ‘डिसोनन्स’ हा जर्मन चित्रपट असल्यामुळे संतोष सध्या एका जर्मन शिक्षकाकडून जर्मन भाषेचे शिक्षण घेत आहेत.

 

Santosh Juvekar 02

 

या चित्रपटाविषयी सांगताना अभिनेता संतोष जुवेकर सांगतात ,आर्मीत जवानांना शारीरिक शिक्षणासोबतच मानसिक शिक्षणही दिले जाते. त्यांच्या मेन्टल फिटनेसची परीक्षा घेताना त्यांच्यासोबत अनेक माइंड गेमही खेळले जातात. त्यांना मानसिकदृष्ट्याही सक्षम करण्यासाठी मेन्टली थर्ड डिग्री ट्रेनिंग देण्यात येते. याच गोष्टीवर ‘डिसोनन्स’ हा चित्रपट आधारित आहे. पिटर या जर्मन आर्मी अधिका-याच्या भूमिका ते साकारत असून या साठी भरपूर मेहेनत घेत आहे.

 

या चित्रपटाचा विषय खूप वेगळा असून येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणा-या एका जर्मन फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट पाठविण्यात येणार आहे. अशा विषयावरचं आधारित आंतराष्ट्रीय प्रोजेक्ट मिळावं, अशी प्रत्येक अभिनेत्याची इच्छा असते.या चित्रपटातील भूमिकेस योग्य न्याय देण्यासाठी त्यांनी या भूमिकेवर कसून मेहनत घेतली आहे. या सर्व प्रशिक्षणातील सर्वात कठीण भाग म्हणजे जर्मन भाषा शिकणं हे हि त्यानी सांगितले. मराठी चित्रपट अभिनेता अश्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय चित्रपटात काम करणे हि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.