Actor Santosh Mayekar Passed Away

विनोदाचे उत्तम टायमिंग असलेले सिने-नाट्य अभिनेते संतोष मयेकर यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. मधुमेहाच्या आजाराशी ते लढा देत होते. मंगळवारी अंधेरी येथील राहत्या घरी संध्याकाळी झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी आहे.

Santosh Mayekar 01

 

अभिनेते संतोष मयेकर यांनी चित्रपट, नाट्य व मालिकांमधून प्रत्येक रसिक मनात स्व:ताचे वेगळे स्थान निर्माण केले . विनोदाचे गुण अंगी असणारे चित्रपट, नाट्य आणि मालिकांमध्ये काम करणारे अभिनेते संतोष मयेकर हे गेल्या अनेक दिवसांपासून मधुमेहाच्या आजाराला झुंज देत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी त्यांचे अंधेरी येथील राहत्या घरी संध्याकाळी झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

 

टाइम प्लीज, ‘ऑल दी बेस्ट’, ‘वस्त्रहरण’, पांडगो इलो रे बा इलो, गॅाडफादर, ‘भैय्या हातपाय पसरी’, वस्त्रहरण, दोन बायका चावट ऐका नाटकांसह संतोष यांनी मराठी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाने वेगळी छाप सोडली होती. ‘फू बाई फू’ या कार्यक्रमात त्यांनी आपल्या धमाल विनोदी शैलीने रसिकांची मने जिंकली होती. ‘देवाशप्पथ खोटे सांगेन’ या चित्रपटाद्वारे मयेकर यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यांनतर त्यांनी ‘चष्मेबहाद्दर’, ‘गलगले निघाले’, ‘आर्त’, ‘दशक्रिया’, सात बारा कसा बदलला, सत्या सावित्री आणि सत्यवान यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.

 

त्यांच्या जाण्याने नाट्य, चित्रपट, व मालिका क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी दुख व्यक्त केले आहे. तर अनेक कलाकरांनी मयेकर यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे.