Actor Lokesh Gupte will direct Kay Kay Menon’s first Marathi Movie

Kay Kay Menon in Marathi 02

 

 

मराठी चित्रपटसृष्टी वाढत चालेली यशस्वी वाटचाल साध्य सगळीकडे चर्चेचा विषयी झाली आहे. ‘सैराट’, ‘नटरंग’, ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या दमदार मराठी चित्रपटांनी ज्या पद्धतीने बॉक्स आॅफिसवर आपली छाप सोडली त्यामुळे अनेक बॉलिवूड कलाकार निर्माते मराठी चित्रपटसृष्टीकडे आकर्षित झाले आहेत. हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सध्या मराठी चित्रपट करत आहेत. असेच एक बॉलीवूड मधील दिग्ग्ज के. के. मेनन लवकरच एका मराठी चित्रपटात झळकणार आहेत. देवी सातेरी प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘एक सांगायचंय…UNSAID HARMONY’ या चित्रपटातून ते मराठीत पदार्पण करीत आहेत. तसेच प्रसिद्ध अभिनेता लोकेश गुप्ते याच चित्रपटातून आपल्या नव्या इनिंगला सुरूवात करणार असून, तो दिग्दर्शकाची भूमिका समर्थपणे पार पाडताना दिसणार आहे.

 

Kay Kay Menon in Marathi 01

अभिनेता लोकेश विजय गुप्तेने मराठी रंगभूमी, टीव्ही मालिका, चित्रपट या सर्व माध्यमांतून काम करत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या सर्व माध्यमांतून कामाचा अनुभव घेऊन आता लोकेश चित्रपट दिग्दर्शनाकडे वळला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाची निर्मितीपूर्व प्रक्रि या पूर्ण झाली असून, दि.९ मार्चला या चित्रपटाच्या चित्रिकरणास सुरुवात होणार आहे.

 

मराठीत चित्रपटात पदार्पणाविषयी बोलताना के. के. मेनन याने सांगितले की, ‘मराठी चित्रपट मी पाहतो. मराठी चित्रपटाच्या कथा माझ्या मनाला भिडतात. चित्रपटाची कथा मला लोकेशने ऐकवली तेव्हा माझ्या मनाला भिडली. मी क्षणाचाही विलंब न करता लगेचच होकार दिला. महाराष्ट्रात राहत असल्याने मराठी भाषा मी खूप ऐकली आहे. मला मराठी भाषा बोललेली समजते सुद्धा. या चित्रपटासाठी मी मराठीचे धडे गिरवणार आहे, असे त्याने सांगितले.’ ‘एक सांगायचंय…UNSAID HARMONY’ हा चित्रपट पालक आणि मुले यांच्यामधल्या न बोलल्या गेलेल्या सुसंवादाबद्दल आहे. बदलेली जीवनशैली, पालकांचे व्यस्त वेळापत्रक, मुलांकडून असलेल्या अपेक्षा, दिवसागणिक बदलत जाणारे जग, जीवघेणी स्पर्धा, मुलांची आणि पालकांची बदलत जाणारी मानसिकता, त्याचे पालक आणि मुले या दोघांवरही होणारे बरे-वाईट परिणाम या चित्रपटाद्वारे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

 

‘एक सांगायचंय…UNSAID HARMONY’ हा चित्रपट १८ आॅक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. संजय मेमाणे, पुष्पांक गावडे यांची सिनेमॅटोग्राफी, अभिनेता जितेंद्र जोशीचे गीतलेखन, शैलेंद्र बर्वेचे बहारदार संगीत, नितीन कुलकर्णी यांचे कलादिग्दर्शन आणि चैत्राली लोकेश गुप्ते यांची वेशभूषा या चित्रपटाला लाभणार आहे.