Actor Govind Namdev will be seen in upcoming movie ‘Sur Spata’

Sur Sapata 01

 

अनेक दर्जेदार हिंदी चित्रपट तसेच मालिकांमधून आपल्या सकस अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे सुप्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव यांनी चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी खऱ्या अर्थाने खलनायकी भूमिकांत जीव ओतला असे म्हणणे चुकिचे ठरणार नाही. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकांमध्ये व्हिलनगिरीची एक अनोखी झलक दिसून आली आहे. अशी उत्तम अभिनयाची जादू दर्शवायला पहिल्यांदाच लाडे ब्रोज् फिल्म्स प्रा. लि आणि मंगेश कंठाळे दिग्दर्शित ‘सूर सपाटा’ या मराठी चित्रपट झळकणार आहे. ‘सूर सपाटा’ हा चित्रपट २२ मार्चला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 

अभिनेता गोविंद नामदेव आगामी चित्रपट ‘सूर सपाटा’ मध्ये वरून कडक आणि आतून प्रेमळ अशा गुरुजींची भूमिका साकारणार आहे. अभ्यास आणि खेळ या दोन्हींचे महत्त्व पटवून देणाऱ्या शिक्षकाच्या भूमिकेत आपण त्यांना पाहणार आहोत. उनाड पण कुशल असलेल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट ‘सूर सपाटा’ या चित्रपटाची कथा मंगेश कंठाळे यांनी लिहिली आहे. जयंत लाडे यांनी या चित्रपटाची निर्मित केली असून ‘सूर सपाटा’ या आधी त्यांनी ‘पेईंग घोस्ट’ या विनोदी चित्रपटाची यशस्वी निर्मिती केली होती.

 

‘सूर सपाटा’ या चित्रपटात हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर, सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनावणे आणि निनाद तांबावडे या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘सूर सपाटा’ हा चित्रपट प्रकाश नाथन, हिमांशू आशेर, संजय पतोडीया आणि अर्शद कमल खान यांची प्रस्तुत असून किशोर खिल्लारे, सुभाष गुप्ता, सतीश गुप्ता आणि जगदीश लाडे यांची सहनिर्मिती आहे. या शिवाय उपेंद्र लिमये, संजय जाधव,अभिज्ञा भावे या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.