Is actor Abhinay Berde dating co-star Hemal Ingle ?

लवकरच तुमच्या भेटीसाठी ‘अशी ही आशिकी’ हा चित्रपट येत आहे. या चित्रपटातील मुख्य कलाकार हेमल आणि अभिनय या जोडीमधील केमिस्ट्री आता ऑफ स्क्रिनवर पण दिसतेय. मराठी इंडस्ट्रीतील हे नवीन कपल असेल असे बोले जात आहे. या चित्रपटातील स्वयम आणि अमरजा या जोडीची भूमिका साकाराणारे अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे खरोखरच एकमेकांना डेट तर करत नाहीएत ना… असा प्रश्न सगळ्यानाच आता पडला असेल. याच कारण देखील तसंच आहे प्रमोशनच्या दरम्यान या दोघांच्या हावभावातून ते पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेस असं कुठेही जाणवत नाही.

 

या शिवाय प्रमोशन दरम्यान अभिनय आणि हेमल यांच्यामध्ये तयार झालेली जवळीक दाखवणारे काही फोटोस् सध्या व्हायरल झाले आहेत. यामुळे ते डेट करत आहेत का ? अशी चर्चा सगळीकडे रंगत आहे. असे असले तरीही सध्या हे दोघेही या विषयावर काही बोलू इच्छित नाही . यामुळे खरं काय ते अजून कळलेलं नाही.

 

‘अशी ही आशिकी’ पाहिल्यावर प्रत्येकजण म्हणेल की वेड्यासारखं आणि मनापासून प्रेम करावे . पडद्यावरील या दोन्ही कलाकारांची केमिस्ट्री ही उत्तम जुळली आहे किंवा नाही हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर कळेलच परंतु खऱ्या आयुष्यात खरंच ते दोघं एकमेकांसोबत आशिकी करण्याच्या बेतात आहे की नाही हे अजून तरी कळले नाही. येत्या १ मार्चला स्वयम आणि अमरजाची ‘अशी ही आशिकी’ आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की पहा.

 

Abhinay Berde Hemal Ingle AHA Couple 02

 

Abhinay Berde Hemal Ingle AHA Couple 03

 

Abhinay Berde Hemal Ingle AHA Couple 10