Abhinay & Aarya share views on ‘Gudipadwa’

Abhanay +Aarya 02

गुढीपाडवा हा सण मराठी नवीन वर्षाच्या सुरवात करतो. सामान्य लोकांप्रमाणेच सेलेब्रिटीही आपला गुढी पाडवा उत्साहाने साजरा करतात . स रे ग मा पा या कार्यक्रमाने आर्य हिने आपली गायिका म्हणून ओळख निर्माण केली . ती सध्या काय करते या चित्रपटतुन आपल्या अभिनयच ठसा उमटवणारी अभिनेत्री आर्य आंबेकर हि आपल्या गुढी पाडवा या सणाच्या काही आठवणी शेअर केल्या. आर्य असे सांगते कि कामामुळे सर्व सण साजरे करता येत नाही , घरी थांबता येत नाही. पण पाडव्याच्या दिवशी ती आवर्जून घरी थांबते , शोभा यात्रांना जात नाही . अनेक कार्यक्रम या दिवशी पहाटे आयोजित केले जातात पण ती या दिवशी कोणत्याही कार्यक्रमांना जात नाही .तिची आई या दिवशी कडू लिंबाचा पाला खायला देते तेव्हा ती कडू चव जिभेवर रेंगाळत राहते , घरी गुढी उभारली जाते व या प्रकारे उत्साहात हा सण साजरा केला जातो.

मराठी चित्रपटश्रुष्टीतिला हास्यसम्राट दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे . ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटतुन मराठी चित्रपटश्रुष्टीत त्याने पदार्पण केले . अभिनय ने या चित्रपटात सादर केलेला प्रभावी अभिनय व नृत्य यामुळे त्यांनी पहिल्याच चित्रपटात चांगली प्रसिद्धी मिळवली. त्याने केलेल्या या पहिल्या चित्रपटच त्याचे अनेक चाहते निर्माण झाले आहेत. गुढीपाडवा हा सण त्याच्या साठी खास आहे असे तो सांगतो . अभिनय अनेक वर्ष हॉस्टेल मध्ये राहिला त्यामुळे त्याला कोणत्या सणाला काय करतात ते नक्की माहित नव्हते . पण आता मात्र परत घरी आल्यामुळे सण कसे साजरे करतात हे त्याला कळले. यंदाच्या वर्षी गुढी उभारण्याची जबाबदारी त्याच्या आईने त्याच्यावर सोपवली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी असणारे प्रसन्न वातावरण , नवीन कपडे , सुंदर जेवण या सगळ्या गोष्टी त्याला खूप आवडतात. यंदाचे वर्ष हे त्याच्यासाठी खूप लकी आहे असे त्याला वाटे.

Leave a Reply

Your email address will not be published.