Aamir Khan praises this movie trailer

Aamir Khan for Kaccha Limbu 02

मराठी आपण हा ट्रेंड पाहतोय कि मराठी चित्रपटसृष्टीत ज्या प्रकारची निर्मिती होत आहे. त्यांना महाराष्ट्राचं नव्हे तर जगभरात प्रसिद्धी मिळत आहे. अलीकडच्या काळात त्यांनी तांत्रिक प्रगती केली आहे त्याचबरोबर चित्रपटाच्या विषयातील विविधता म्हणजे म्हणजे चित्रपटाची कथा त्यामुळे चित्रपट अधिक उत्कंठावर्धक होत आहे त्याचबरोबर सादरीकरण आणि चित्रपटाच्या प्रमोशनवरही चांगला भर दिला जात आहे. सैराट ह्या चित्रपटामुळे आसा मल्लाचा दगड निर्माण केला ज्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. मराठी चित्रपटसृष्टी हि जगभरात नावारूपास आली आहे त्यामुळे बॉलिवूड तसेच इतर भाषांमधील चित्रपटनिर्माते मराठीकडे आकर्षित होत आहेत. त्याचप्रमाणे बॉलिवूड मधील परफेक्टशनिस्ट आमिर खान हा देखील मराठी चित्रपटाच्या प्रेमात पडला आहे. तो सातत्याने मराठी चित्रपटांचा पाठपुरावा करत असून मराठी चित्रपटांना चांगला मंच उपलब्ध व्हावा व्यासाठी देखील तो प्रयत्न करत आहे.

 

Aamir Khan praises Kaccha Limbu 01

सैराट, फॅण्ड्री , नटरंग हे त्याला त्याला विशेष आवडलेले चित्रपट त्यांनी ह्या चित्रपटांचे तोंडभरून कौतुक केले व हे चित्रपट निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकांच्या पाठीवरहि त्यांनी कौतुकाची थाप दिली ज्यामुळे त्यांना अधिकाधिक चांगले काम करण्याची उमेद निर्माण होईल. काही दिवसांपासून प्रसाद ओक दिग्दर्शित कच्चा लिंबू चित्रपटाची चर्चा सुरु आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे ह्या चित्रपटाच्या ट्रेलरची सुद्धा प्रशंसा आमिरखान ने केली आहे त्याने त्याच्या ट्विटर अकाउंटवर कच्चा लिंबू चा ट्रेलर शेअर केला असून त्याला हा ट्रेलर उत्तम वाटलं आहे असेही त्याने लिहिले आहे.

प्रसाद ओक यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे तसेच या चित्रपटाचा बराचसा भहग कृष्ण-धवल दिग्दर्शित केला आहे. त्यामुळेच हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना वेगळा अनुभव मिळणार आहे. तसेच दिग्दर्शक रवी जाधव हे या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक रवी जाधव अभिनेता म्हणून पदार्पण करत आहे पहिल्यांदाच ते प्रेक्षकांना अभिनेत्याच्या रूपात दिसणार आहेत. ह्या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, मनमित पेम,अनंत महादेवन,रवी जाधव ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत. कच्चा लिंबू हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.